Corona Virusचा दीपिकालाही फटका

जगभरात या व्हायरसची भीती पाहायला मिळत आहे.   

Updated: Mar 3, 2020, 02:53 PM IST
Corona Virusचा दीपिकालाही फटका  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण Deepika Padukone  तिच्या आगामी प्रोजेक्टवर लक्ष केंद्रीत करण्यासोबतच विविध कार्यक्रमांनाही हजेरी लावत आहे. आपल्यावर असणारी प्रत्येक जबाबदारी पार पाडणाऱ्या या अभिनेत्रीने आता मात्र कोरोना व्हायरसचा जगभरात वाढता संसर्ग पाहता एक मोठा निर्णय घेतल्याचं कळत आहे. 

कोरोनाचा Corona Virus फटका एका अर्थी दीपिकालाही बसला आहे. कारण, अतिशय मानाच्या अशा समजल्या जाणाऱ्या पॅरिस फॅशन वीकमध्ये न जाण्याच निर्णय तिने घेतला. Louis Vuitton या ब्रँडशी जोडली गेली असल्यामुळे दीपिकाला या कार्यक्रमाचं बोलावणं आलं होतं. जेथे न जाण्याचा निर्णय तिने घेतला. 

दीपिकाच्या प्रवक्त्यांकडून याविषयीचं पत्रकही जारी करण्यात आलं. ज्यामध्ये याची विस्तृत माहिती देण्यात आली. 'Louis Vuitton`s FW2020 या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी दीपिका फ्रान्सला जाणार होती. पण, कोरोना व्हायरसची लाट ही आता फ्रान्सपर्यंत पोहोचल्याचंही म्हटलं गेलं. त्यामुळे तिने येथे न जाण्याचा निर्णय घेतला आहे', असं या पत्रकात म्हटलं गेलं. 

वाचा : शाहरुखच्या 'स्वदेस'मध्ये झळकलेली अभिनेत्री आज एक 'बिझनेस वुमन'

सुरुवातीला चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगातील इतरही देशांमध्ये पसरू लागला आहे. अनेक देशांमध्ये नागरिकांना याचा संसर्गही झाला आहे. परिणामी याची लागण आणखी वाढू नये यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. फक्त वैद्यकीय स्तरातच नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीने वैक्तिक पातळीवरही या विषाणूची लागण होऊ नये यासाठी काळजी घेण्याचं आवाहन अनेक ठिकाणी करण्यात येत आहे. दीपिकाने उचललेलं हे पाऊलही त्यापैकीच एक म्हटलं जात आहे.