वऱ्हाड निघालं इटलीला! दीपिका- रणवीरच्या लग्नाला जाणार 'हे' सेलिब्रिटी

आमंत्रितांच्या यादीत 'या' मंडळींच्या नावाचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे.   

Updated: Oct 23, 2018, 03:01 PM IST
वऱ्हाड निघालं इटलीला! दीपिका- रणवीरच्या लग्नाला जाणार 'हे' सेलिब्रिटी  title=

मुंबई : एका चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली आणि पाहता पाहता लग्नघटीका समीप आली. सध्याच्या घडीला ही ओळ अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्या नात्यावर अगदी अचूकपणे लागू होत आहे असंच म्हणावं लागेल. 

काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करत लग्नाच्या तारखाही जाहीर केल्या.

लग्न नेमकं कोणत्या ठिकाणी होणार नाही, याविषयीची माहितीसुद्धा अद्याप गोपनीय ठेवण्यात आली आहे. 

मुख्य म्हणजे दीपिका आणि रणवीर त्यांच्या विवाहसोहळ्याविषयी कमालीची गुप्तता पाळत असून, त्यांनी फक्त काही खास मंडळींनाच इटलीतील लेक कोमो येथे पार पडणाऱ्या विवाहसोहळ्याचं बोलावणं पाठवण्यात आलं आहे. 

दीपिका आणि रणवीरच्या कुटुंबियांव्यतिरिक्त या विवाहसोहळ्याला चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची उपस्थिती असल्याचं म्हटलं जात आहे. भन्साळींसोबतचं या दोघांचंही नातं काही नेमकं कसं आहे, याविषयी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. 

त्याशिवाय अभिनेता अर्जुन कपूर, करण जोहर, दिग्दर्शक रोहित शेट्टी ही मंडळीसुद्धा इटलीला रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सध्याच्या घडीला कलाविश्वात या बहुप्रतिक्षित लग्नाच्याच चर्चा रंगत आहेत. 

प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या विवाहसोहळ्याशी प्रत्येकजण जोडला गेला असून दीपिका  आणि रणवीर या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे.