९ वर्षांपूर्वी रणवीरने पाहिलेलं स्वप्न साकार झालं अन्....

असं नेमकं काय स्वप्न पाहिलं होतं त्याने? 

Updated: Dec 10, 2019, 03:13 PM IST
९ वर्षांपूर्वी रणवीरने पाहिलेलं स्वप्न साकार झालं अन्.... title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग याचा प्रत्येक चित्रपट हा प्रदर्शनापूर्वी प्रेक्षकांमध्ये जितकं कुतूहल निर्माण करतो, तितकंच यश आणि लोकप्रियता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही त्याला मिळते. अशा या अतरंगी रणवीरने एक स्वप्न पाहिलं होतं, जे साकार झालं आणि त्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत रणवीरने कधीच मागे वळून पाहिलं नाही. कलाविश्वात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्या रणवीरचं ते स्वप्न होतं या लखलखणाऱ्या दुनियेत तितकीच तेजस्वी कारकिर्द घडवण्याचं. 

सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याची मुख्य भूमिका असणाऱ्या 'बँड बाजा बारात' या चित्रपटाचं ते दृश्य पाहायला मिळत आहे, जेथे 'Introducing Ranveer Singh' अर्थात, घेऊन आलो आहो एक नवा चेहरा... रणवीर सिंग असं लिहिलेलं दिसतं. अर्थात हे दृश्य आणि हा चित्रपट रणवीरच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

'नऊ वर्षांपूर्वी हे सारंकाही स्वप्नच होतं.... त्या दिवसापासून ते आजपर्यंत....', असं कॅप्शन देत त्याने ही पोस्ट शेअर केली.  या चित्रपटाशी रणवीरच्या जोडल्या गेलेल्या भावनांचं महत्त्वं जितचं त्याच्यालेखी इतर कोणत्य़ाही गोष्टीपेक्षा जास्त आहे, त्याचप्रमाणे चाहत्यांसाठीही हा चित्रपट तितकाच जवळचा आहे. 

 
 
 
 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

'बँड बाजा बारात'च्या निमित्ताने रणवीरने 'बिट्टू शर्मा' या दिल्लीस्थित तरुणाची भूमिका साकारली होती. अभिनेत्री अनुष्का शर्माने या चित्रपटातून त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटापासून बॉलिवूडमध्ये सुरु झालेली त्याची घोडदौड पाहता नवोदित कलाकारांसाठी तो जणू एक प्रेरणास्त्रोतच आहे. 'राम-लीला', 'गुंडे', 'गली बॉय', 'पद्मावत', 'बाजीराव मस्तानी' अशा चित्रपटांमधून झळकलेला रणवीर येत्या काळात '`८३' या चित्रपटातून झळकणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि देशाला पहिला क्रिकेट विश्वचषक मिळवून देणाऱ्या कपिल देव यांची व्यक्तिरेखा तो साकारणार आहे.