अरबाज खानने शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाला 'तुझ्या सौंदर्याने...'

अरबाज खानने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. त्यातील अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे. 

Updated: Jan 18, 2024, 03:27 PM IST
अरबाज खानने शेअर केला पत्नीसोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाला 'तुझ्या सौंदर्याने...' title=

बॉलिवूड अभिनेता आणि सलमान खानचा भाऊ अरबाज खान गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. अरबाज खानने 24 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. अरबाजने प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधत नवीन आयुष्याची सुरुवात केली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अरबाजची दुसरी पत्नी शुरा खानचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अरबाज खानने खास पोस्ट शेअर केली आहे. 

अरबाज खान हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच अरबाजने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने पत्नी शूरासोबतचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. यात अरबाज हा शूराला गालावर किस करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्याने पत्नी शूरा खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

अरबाज खानने दिल्या खास शुभेच्छा

अरबाजने पत्नीला शुभेच्छा देताना म्हटले की, "माय लव्ह शूरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला कोणीही इतकं आनंदात ठेवू शकत नाही, जितकं तू ठेवतेस. तू माझ्या आयुष्य खरंच प्रकाशमय केलंस. मला तुझ्यासोबत मोठं व्हायचं आहे... अरे मोठं नाही, खरंतर वृद्ध व्हायचं आहे. खूप खूप वृद्ध."

"माझ्यासाठी तो क्षण खरंच खूप खास होता, जेव्हा आपलं नशीब आपल्याला एकत्र घेऊन आले. जेव्हा मी पहिल्यांदा तुझ्यासोबत डेटवर गेलो होतो, तेव्हाच मला कळले होते की मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवणार आहे. तू तुझ्या सौंदर्याने आणि हुशारीने मला नेहमीच मोहित करतेस. मला अजूनही आठवतंय की, जेव्हा मी तुझ्यासाठी कबूल है असं म्हटलं, तेव्हा तो शब्द माझ्याकडून तुझ्यासाठी म्हटलेला सर्वोत्तम शब्द होता. आय लव्ह यू", असेही अरबाज खान म्हणाला. 

अर्पिता खानचीही खास पोस्ट

अरबाज खानने लिहिलेली ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करताना दिसत आहेत. त्यातील अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत यावर कमेंट केली आहे. तर अनेक चाहते त्याची ही पोस्ट लाईक करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर अरबाज खानची बहीण अर्पिता खान हिनेही शूराला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अर्पिताने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात तिने शूरासोबतचा एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शूरा ही अर्पिताला मिठी मारताना दिसत आहे. 'तुला 31 व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा', असे अर्पिताने म्हटले आहे. 

दरम्यान अरबाजने वयाच्या 56 व्या वर्षी मेकअप आर्टिस्ट शुरा खानबरोबर लग्नगाठ बांधली. त्यांनी 24 डिसेंबर 2023 रोजी दुसऱ्यांदा निकाह केला. अरबाज आणि शुराच्या लग्नाला खान कुटुंबियांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळीही उपस्थित होती. त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.