Chhapaak : दीपिकाआधी 'या' अभिनेत्रीने साकारलेली ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका

तिने साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. 

Updated: Dec 12, 2019, 04:29 PM IST
Chhapaak : दीपिकाआधी 'या' अभिनेत्रीने साकारलेली ऍसिड हल्ला पीडितेची भूमिका  title=
छपाक, उयरे ; Chhapaak, Uyare

मुंबई : मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक' Chhapaak या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. Deepika Padukone दीपिका पदुकोणची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या या चित्रपटात लक्ष्मी अग्रवाल या ऍसिड हल्ला पीडितेच्या जीवनातील काही बरंच काही सांगून जाणाऱ्या प्रसंगांवर भाष्य करण्यात आलं आहे. 

Chhapaakचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनीच नव्हे, तर बॉलिवूड कलाकारांनीही दीपिकाची आणि मेघना गुलजार यांची प्रशंसा करत त्यांच्या या प्रयत्नांना दाद दिली. इतकच नव्हे, तर या चित्रपटाच्या निमित्ताने आणखी एका अभिनेत्रीच्या नावाचीही बरीच चर्चा, किंबहुना प्रशंसा झाली. 

दीपिकाच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आलेली ती अभिनेत्री म्हणजे पार्वती थिरुवोतू Parvathy Thiruvothu. यावेळी पार्वतीने सर्वांचं लक्ष वेधण्याचं कारण म्हणजे तिचा 'उयरे' हा मल्याळम चित्रपट. ज्याचा उल्लेख करत एका ट्विटर युजरने पार्वती आणि दीपिकाच्या अभिनयाला दाद दिली. 

Chhapaak trailer : वेदनांची दाहकता सांगणारा 'छपाक'चा ट्रेलर पाहाच

सोशल मीडियावर आपल्या चित्रपटाविषयीचं हे ट्विट पाहत पार्वतीनेही त्याबद्दल आभारही व्यक्त केले. Uyare या चित्रपटातून पार्वतीने एका अशा मुलीची, 'पल्लवी'ची भूमिका साकारली होती, जिचं वैमानिक होण्याचं स्वप्न होतं. पण, काळाच्या चक्रात मात्र काही वेगळंच होण्याचं ठरलं होतं. पूर्वाश्रमीच्या प्रियकराकडून तिच्यावर ऍसिड हल्ला करण्यात येतो ज्यामुळे तिचं आयुष्यच बदलून जातं असं या चित्रपटाच्या कथानकातून उलगडत गेलं. पार्वतीने या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. ज्या धर्तीवरच 'छपाक'च्या निमित्ताने तिचीही प्रशंसा केली जात आहे.