Athiya Shetty and KL Rahul Wedding : लेकिहून आईच सरस; सुनील शेट्टीच्या व्यवसायात पत्नीच अग्रेसर, काय काम करते पाहाच

Athiya Shetty and KL Rahul Wedding : सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच एकाएकी माना शेट्टी या नावानंही नजरा वळवल्या आहेत.   

Updated: Jan 23, 2023, 11:48 AM IST
Athiya Shetty and KL Rahul Wedding : लेकिहून आईच सरस; सुनील शेट्टीच्या व्यवसायात पत्नीच अग्रेसर, काय काम करते पाहाच  title=
athiya shetty and kl rahul wedding know more about suniel shettys wife mana shetty bollywoods lady ambani

Athiya shetty and KL Rahul Wedding : अभिनेता सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी सध्या आनंदाच्या शिखरावर आहेत. अर्थात त्यांच्या मनात काहीशी हुरहूरही आहे. कारण, त्यांची लाडाची लेक अथिया (Athiya shetty) आता तिच्या सासरी जाणार आहे. (Team India) भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू के.एल. राहुल (KL Rahul) याच्यासोबत अथिया एका नव्या प्रवासाची सुरुवात करतेय. बॉलिवूडच्या (bollywood) अन्नाच्या लेकीला सध्या अनेकजण शुभेच्छा देत आहेत. त्यातच अभिनेता अजय देवगन यानं ट्विट करत या शुभप्रसंगी सुनील शेट्टी आणि त्याच्या पत्नीलाही शुभेच्छा दिल्या आहेत. 

तुम्हाला माहितीये का? सुनील शेट्टी (Suniel shetty daughter wedding) हा त्याच्या चित्रपटांसोबतच विविध व्यवसायांसाठीसुद्धा ओळखला जातो. त्याच्या याच (Suniel shetty business) व्यवसायांची धुरा, त्यांचं व्यवस्थापन या साऱ्याची जबाबारी त्याच्या पत्नीच्या म्हणच माना शेट्टीच्या (Mana Shetty) खांद्यांवर आहे. बॉलिवूडची 'लेडी अंबानी' (Bollywoods lady Ambani) अशी तिची या कलाजगतातील ओळख. 

माना एक यशस्वी उद्योजिका... 

मानाकडे पाहिलं तर, अथिया आणि तिच्या चेहऱ्यामध्ये बरंच साम्य दिसतं. अनेकजण तर माना आणि (Athiya shetty) अथियामध्ये बाचकतातही. त्यामुळं इथं आई, तशी लेक असं म्हणायला हरकत नाही. माना एक यशस्वी उद्योजिका आहे. तिच्या नावाचा उल्लेख अनेक मोठ्या कार्यक्रम आणि पेज 3 इवेंटमध्ये होतो. (Mumbai) मुंबईतील काही प्रतिष्ठीत मंडळींमध्ये तिलाही गणलं जातं. अनेक प्रदर्शनांच्या माध्यमातून गरजूंसाठी मदतीचा हात देण्यासाठी ही हीरीरिनं पुढाकार घेताना दिसते. 

बऱ्याच (NGOs) स्वयंसेवी संस्थांना आर्थिक पाठबळ देत समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी ती आणि तिची टीम काम करते. रिअल इस्टेटशिवाय (Real Estate) ती, चित्रपट निर्मीतीमध्येही (Film Production) सक्रीय आहे. याशिवाय बुटीक, हॉटेलिंग अशा विविध व्यवसायांमध्ये ती बुद्धीचातुर्यानं हेवा वाटण्याजोगं काम करताना दिसते. 

हेसुद्धा पाहा : VIDEO : फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ VIRAL

sunil shetty fall in love with mana shetty in first sight they had been  waiting nine years to convince parents | सुनील शेट्टी को हुआ था पहली नजर  में प्यार, पत्नी माना

माना तिचा पती, सुनील शेट्टीला (Suniel shetty wife) व्यवसायात हातभार लावते आणि कुटुंबालाही तितकंच प्राधान्य देते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण माना रिअल इस्टेट फर्मही चालवते. S2 रियलिटी ऐंड डेव्हलपर्स असं तिच्या कंपनीचं नाव. यामध्ये तिला पतीची साथ लाभते. माना आणि सुनील शेट्टीच्या या कंपनीकडून मुंबईत 21 आलिशान व्हिला उभारण्यात आले आहेत. थोडक्यात मानाच्या कर्तृत्त्वापुढे तिच्या लेकिचं कौतुकही फिकं पडेल. पण, आई इतकी ग्रेट असताना खुद्द अथियालाही तिचा हेवाच वाटत असेल यात वाद नाही.