'आदिपुरुष' वादादरम्यान पुन्हा एकदा TV वर दिसणार रामानंद सागर यांचं 'रामायण'; पाहा प्रदर्शनाची तारीख, वेळ

Ramanand Sagar Ramayan To Retelecast: 'आदिपुरुष' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक आठवड्यांपासून सोशल मीडियावर या मालिकेची चर्चा असून अनेकांनी या मालिकेतील स्क्रीनशॉट आणि छोटे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 28, 2023, 10:56 AM IST
'आदिपुरुष' वादादरम्यान पुन्हा एकदा TV वर दिसणार रामानंद सागर यांचं 'रामायण'; पाहा प्रदर्शनाची तारीख, वेळ title=
या संदर्भातील माहिती सोशल मीडियावरुन प्रोमो शेअर करत देण्यात आलीय

Ramanand Sagar Ramayan To Retelecast: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच्या प्रदर्शनापासून 80 च्या दशकामध्ये टीव्हीवर प्रदर्शित झालेल्या रामानंद सागर दिग्दर्शित 'रामायण' (Ramanand Sagar Ramayan) या मालिकेची सोशल मीडियावर तुफान चर्चा असल्याचं पहायला मिळत आहे. अनेकांनी 'आदिपुरुष' चित्रपटामधील पात्र, कथेशी करण्यात आलेली मोडतोड यासारख्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर हे जुनं 'रामायण' (Ramayan) अधिक छान होतं असं अनेकांनी यामधील छोटे व्हिडीओ आणि स्क्रीनशॉट पोस्ट करत शेअर म्हटलं. एकीकडे अनेकांना या मालिकेची आठवण होत असतानाच दुसरीकडे 'शेमारु टीव्ही'ने त्यांच्या इन्स्ताग्राम अकाऊंटवरुन या जुन्या 'रामायण' मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

कधी दाखवली जाणार ही मालिका?

"सर्व प्रिय प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत जगप्रसिद्ध पौराणिक मालिका 'रामायण'" अशी कॅप्शनसहीत हा प्रोमो 'शेमारु टीव्ही'ने शेअर केला आहे. 'रामायण' मालिका 3 जुलैपासून रोज सायंकाळी साडेसात वाजता दाखवली जाणार आहे. ही मालिका 'शेमारु टीव्ही'वर प्रदर्शित होणार आहे. या मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी प्रभू श्री रामाची, दिपिका चिखालिया यांनी सीता मातेची तर सुनील लाहिर यांनी लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे. दिवंगत अभिनेते दारा सिंग यांनी हनुमानाची भूमिका साकारली असून अरविंद तिवारी यांनी रावणाची भूमिकेत झळकले होते.

अनेकांनी केल्या कमेंट्स

आजही 'रामायणा'वर आधारित सर्वोत्तम मालिका म्हणून रामानंद सागर यांच्या या मालिकेचा उल्लेख केला जातो. ही मालिका सर्वात आधी 25 जानेवारी 1987 पासून 31 जुलै 1988 दरम्यान प्रदर्शित करण्यात आली होती. या मालिकेला तुफान प्रतिसाद मिळाला होता. अनेकांनी या प्रोमोवर हार्ट आणि 'जय श्री राम' अशा कमेंट्स केल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shemaroo TV (@shemaroo.tv)

कोरोना कालावधीमध्येही ही मालिका दाखवण्यात आलेली

2020 मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये दूरदर्शनवर लोकाग्रस्तव ही मालिका पुन:प्रदर्शित करण्यात आली होती. तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली होती. 

'आदिपुरुष'वरुन वाद

रामानंद सागर दिग्दर्शित ही मालिका 'आदिपुरुष' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून पुन्हा चर्चेत आहे. या मालिकेमधील कलाकार, कथा आणि रचना ही 'आदिपुरुष'पेक्षा अनेक पटींनी उत्तम होती असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. 'आदिपुरुष'च्या निर्मात्यांनी रामानंद सागर यांच्या दृष्टीकोनातून साकारलेली ही मालिका आदर्श मानून प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान या सारख्या तगड्या स्टारकास्टच्या मदतीने मोठ्या पडद्यावर रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला असता तरी चित्रपट हीट ठरला असता असंही अनेकांनी म्हटलं आहे.