अभिनेता संतोष जुवेकर अडकणार लग्नबंधनात? पोस्ट शेअर करत दिली माहिती

अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. 

Updated: Sep 26, 2022, 12:14 AM IST
अभिनेता संतोष जुवेकर अडकणार लग्नबंधनात? पोस्ट शेअर करत दिली माहिती title=

मुंबई : अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो आपलं मनातलं सांगण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेतो. आताही संतोषनं एक पोस्ट त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यात त्यानं असं काही लिहिलं आहे. जे वाचून त्याचे चाहते आनंदित झाले आहेत.

संतोषनं स्वत:चा एक फोटो शेअर करत पोस्टमध्ये लिहीलं की,  पोस्ट करत लिहिलं आहे, ''मित्रांनो अचानक एक खूप मोठी आणि खूपच आनंदाची गोष्ट माझ्या आयुष्यात घडतेय. जिची मी आतुरतेने वाट पाहत होतो. ती माझ्या आयुष्यात आलीये. आणि ज्याबद्दल तुम्हीदेखीस मला विचारयचात की, कधी संत्या कधी? तर मित्रांनो आमचं सगळं ठरलंय आणि मुहूर्तही ठरलाय आता तुमच्यासोबत हा आनंद शेअर कारायचाय. म्हणूनच उद्या भेटूयात. नक्की यायचं हं. आग्रहाचं आमंत्रण आमच्याकडनं!!!''

याचबरोबर संतोषने याला लग्नाची लग्नाची धूनही जोडली आहे. त्यामुळे आता संतोष लग्न करणार असल्याची शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जातेय. याचबरोबर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ही post बघून तुमच्या मनात नक्कीच एक विचार आलाय आणि जो आलाय तो अगदी योग्य आहे. उद्या तुम्ही, मी आणि आणि आणि........ म्हं.......!!! बघू आणि कोण आहे ते direct भेटावतोच ना live येताय नं उद्या संध्याकाळी ६ वाजता #facebook live आणि ७ वाजता #instagram live ला? याच वाट पहातोय.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्याने ही पोस्ट शेअर सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होऊ लागलीये. याचबरोबर त्याच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. पण खरचं संतोष जुवेकर लग्न करतोय की, हा कोणता तरी प्रमोशनल फंडा आहे. हे पाहणं आता औत्युक्याचं ठरणार आहे.