तो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले

Abdu Rozik Viral Video : Abdu Rozik चा बेडरुम व्हिडीओने इंटरनेटवर खळबळ माजली आहे. तो, ती आणि तिसरा असे तिघांचा एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर तो व्हायरल झाला आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 28, 2023, 09:53 AM IST
तो, ती आणि तिसरा! Abdu Rozik चा बेडरुम VIDEO VIRAL झाल्यानंतर नेटकरी संतापले title=
Abdu Rozik Bedroom Video viral on Internet Abdu Rozik troll today trending video google news

Abdu Rozik Bedroom Video : ताजिकिस्तानी गायक अब्दू रोजिक कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो. सोशल मीडियावर अब्दू रोजिकचे असंख्य फॉलोअर्स आहेत. त्याने इंस्टाग्रामवर बेडरुममधील एक व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी संतापले आहेत. या व्हिडीओमध्ये एका तरुणीसोबत ती आणि दुसरा एक तरुण दिसतं आहे. (Abdu Rozik Bedroom Video viral on Internet Abdu Rozik troll today trending video google news)

नेमका काय आहे 'या' व्हिडीओमध्ये ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण आणि तरुणी बेडमध्ये झोपले आहेत. व्हिडीओमधील हा तरुण बॉक्सर लिकलमन आहे. तो झोपून उठल्यावर तो बेडवरुन उतरुन निघून जातो. तरुणीला ही जाग येते. तेवढ्यात तिच्या पायाखालच्या बाजूने अब्दू रोजिक बाहेर पडतो हे पाहून तरुणी अवाक् होऊन जाते. 

मजेदार व्हिडीओने नेटकरी संतापले

अब्दू सध्या लंडनमध्ये आहे. तिथे तो बॉक्सर लिकलमनला भेटला असता त्याने हा मजेदार व्हिडीओ बनवला. लिकलमनची उंचीही 3 फूट एवढी आहे. हा व्हिडीओमधील संकल्पना ही यूकेमधील खूप प्रसिद्ध व्हायरल ट्रेंड आहे. या व्हिडीओमधील अब्दूच्या कृत्याने नेटकरी संतापले आहेत. 

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नाराजी दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकराने म्हटलं की, 'अब्दू किस लाइन में आ गया...' दुसर्‍याने लिहिलं की, 'भाऊ कृपया असे नाटक करू नका'

हा व्हिडीओ अब्दूने त्याच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर शेअर केला आहे.  त्यानंतर सोशल मीडियावर