'एक जोडप्याचं दुसरं लग्न'; 'जाऊ बाई गावात'मध्ये पार पडणार लग्नसोहळा

 नुकताच झी मराठीवर जाऊ बाई गावात हा नवा रिऍलिटी शो सुरु झाला आहे. या शोने लोकांमध्ये  उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते आतापर्यंत रोज काही ना काही नवीन टास्क या शोमध्ये पाहायला मिळत आहेत. या शोचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे.

Updated: Dec 17, 2023, 09:42 PM IST
'एक जोडप्याचं दुसरं लग्न'; 'जाऊ बाई गावात'मध्ये पार पडणार लग्नसोहळा title=

मुंबई : नुकताच झी मराठीवर जाऊ बाई गावात हा नवा रिऍलिटी शो सुरु झाला आहे. या शोने लोकांमध्ये  उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते आतापर्यंत रोज काही ना काही नवीन टास्क या शोमध्ये पाहायला मिळत आहेत. या शोचं सुत्रसंचालन अभिनेता हार्दिक जोशी करत आहे. ह्या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे. कधी ना पहिला असा एक रिऍलिटी शो त्यांच्या भेटीस आला आहे ज्याची चाहते अतुरतेने वाट पाहत होते. नुकताच  'जाऊ बाई गावात' एक प्रोमो झी मराठीने आपल्या  सोशल मीडियावर  शेअर केला आहे.

झी मराठीच्या इन्स्टावरुन हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. याच्या कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, मुलींनी लावलेलं लग्न गावात गाजणार, शुभविवाहाचा टास्क पाहूया कसा संपन्न होणार…!‘जाऊ बाई गावात’ उद्या, 9:30 PM या व्हिडीओवर चाहते कमेंट करुन थकत नसल्याचं दिसत आहे. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक्स कमेंटचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहीलं आहे की, जेवायला आम्ही पण येऊ मग तर अनेकांनी या शोवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या शोमध्ये राणा दादा म्हणजेच हार्दिक जोशी सुत्रसंचालन करताना दिसत आहे. 

'तुझ्यात जीव रंगला 'या' मालिकेत राणादा या ही भूमिका साकारुन घरा-घरात पोहचलेला हार्दिक तुफान लोकप्रिय झाला. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेनंतर हार्दिकने अनेक मालिकांद्वारे आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना दाखवली. मात्र तरीही लोकं त्याला आजही राणा दा याच नावाने ओळखतात. त्याचा चालतय की हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की, लोक रोजच्या बोलण्यातही तो वापरु लागले. हार्दिकने पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर पुनरागमन केलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सध्या हार्दिकची ही स्टाईलही प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. यामध्ये गावचा प्रतिनिधी म्हणून हार्दिक जोशी सगळ्याच कटेंस्टंची अनेकदा शाळा घेताना दिसतो. तर अनेकदा हार्दिक जोशी स्पर्धकांना खडेबोल सुनावतो. आता प्रेक्षकांची उत्कंठा वाढणार आता मजा येणार, जेव्हा हे स्पर्धक एक गावकरी बनून कार्य  करणार. मनोरंजनाची ही रंगतदार आतिषबाजी पाहायला विसरू नका  ‘जाऊ बाई गावात' सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता फक्त झी मराठीवर.