दीपिका - रणवीर लग्न करणार 'त्या' ठिकाणची 5 खास वैशिष्ट्य

पाहा 5 खास वैशिष्ट्य

दीपिका - रणवीर लग्न करणार 'त्या' ठिकाणची 5 खास वैशिष्ट्य title=

मुंबई : अखेर सगळ्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे. बॉलिवूडमधल्या रोमँटिक जोडीच्या लग्नाची अधिकृत माहिती हाती आली आहे. दीपिका पदुकोण - रणवीर सिंह लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे. 20 नोव्हेंबर 2018 मध्ये दीपिका - रणवीर इटलीमध्ये लग्न करणार आहेत. फिल्मफेअरने अधिकृतपणे दिलेल्या माहितीत असे म्हटलं आहे की, फक्त 30 लोकं या लग्न समारंभात सहभागी होणार आहेत. 

तसेच सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इटली हे दीपवीर यांच्या सगळ्यात जवळच ठिकाण आहे. त्यामुळेच त्यांनी इटलीतील लेक कोमो येथे लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांचीही आवडीची जागा असल्यामुळे त्यांच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा दिवस त्यांना इटलीमध्ये साजरा करायचा आहे. त्यानंतर भारतात आल्यावर अगदी शाही पद्धतीने रिसेप्शन असल्याचं देखील म्हटलं आहे. 

हा सोहळा इटलीतील लेक कोमो येथे होणार आहे. इटली हे रोमँटिक जागा म्हणून ओळखले जातं. येथील लेक कोमो ही अतिशय सुंदर जागा आहे. पाहूया या ठिकाणच्या 5 खास गोष्टी 

1) लेक कोमो ही इटलीतील सर्वात मोठी नदी आहे. लेक कोमो या नदीचा तिसरा क्रमांक लागतो. तसेच लेक लोको ही युरोपमधील सर्वात खोल नदी आहे. 

2) लेको, वेरेनना, मेनागजिओ, कोमो आणि बेलिगियो ही तलावाच्या सभोवतालची मुख्य शहरे आहेत. कर्डिनबाबिया, व्हिला कार्लोटा, ट्रेमेझो, लिनो ही गावं देखील त्या शेजारी वसली आहेत. 

3) 85 हजार लोकसंख्या असलेलं हे छोटंस गाव आहे.  या शहरात खूप कमी लोकवस्ती आहे. त्यामुळे येथील सगळ्या गोष्टी खूप महाग असल्याचं सांगितलं जातं. 

4) जर तुम्हाला शॉपिंग करण्याची सवय असेल तर ही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची आहे. लेक कोमो ही शॉपिंगसाठी नंदनवन म्हटलं जातं. ही जागा फक्त सुंदरच नाही तर इथे शॉपिंग करण्याचा अनुभव देखील वेगळा आहे. 

5) जर तुम्हाला इटली अनुभवायच असेल तर तेथील जागा पाहण आणि त्याचा आनंद घेणं हे महत्वाच असेल. तुम्हाला लेक कोमो अनुभवायचं असेल तर ती उत्तम जागा आहे. लेक कोमो ही विज्ञान आणि सुंदरता यांनी नटलेली आहे. आणि हे सगळं अनुभवायचं असेल तर अत्यंत स्वस्तात तुम्ही अनुभवू शकता.