Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी

Saptahik Rashi Bhavishya 29 april to 5 may 2024 : हा आठवड्या 4 राशीच्या लोकांसाठी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. नोकरी आणि व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. जाणून घ्या मेष ते मीन राशीपर्यंत साप्ताहिक राशीभविष्य 

नेहा चौधरी | Updated: Apr 28, 2024, 11:23 PM IST
Weekly Horoscope : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' लोकांना पदोन्नतीसह वेतनवाढ? यांना 7 दिवस घ्यावी लागणार काळजी title=
weekly horoscope 29 april to 5 may check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi

Weekly Horoscope 29 april to 5 may 2024 in Marathi :  मे महिन्याचा पहिला आठवडा काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अडचणीचा ठरणार आहे. लक्ष्मीनारायण योग, गजकेसरी राजयोग आणि षष्ठ राजयोग काही राशींसाठी आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे. एकंदरी हा आठवडा मेष ते मीन राशीसाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून 

मेष (Aries Zodiac)  

या आठवड्यात मेष राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये सक्रिय राहणे गरजेचं आहे. या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच त्यांच्या करिअरमध्येही प्रगती होणार आहे. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरु होणार आहे. आर्थिक स्थिती अनुकूल असणार आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात नफा मिळणार असल्या तरी खर्चही तेवढाच होणार आहे. कुठल्याही वादात अडकू नका. कामात व्यस्त असल्यामुळे कुटुंबाला कमी वेळ देणार आहे. दुखापत होण्याची भीती आहे. 
शुभ दिवस: 29,2

वृषभ (Taurus Zodiac) 

या राशीच्या लोकांनी या आठवड्यात वरिष्ठांच्या आदेशाच पालन करावं. तर व्यापाऱ्यांना व्यवसायाबरोबरच प्रसिद्धीवरही भर द्यावा लागणार आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. तरुणांना मेहनत करावी लागणार आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ व्यतित करा. वाढता उन्हाचा तडाखा पाहता आवश्यक असल्यास दुपारच्या वेळी बाहेर पडा. 
शुभ दिवस: 29,2

मिथुन (Gemini Zodiac)

या लोकांनी कामाच्या ठिकाणी मस्करी न करता कामावर लक्षकेंद्रीत करावी अन्यथा त्यांचं नुकसान होऊ शकतं. व्यवसायिकांना अनेक अडथळांचा सामना करावा लागणार आहे. तरुणांनी शॉर्टकटचा वापर न करता मेहनत केल्यास त्यांना यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. ग्रहांची स्थिती पाहता कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.
शुभ दिवस: 2

कर्क (Cancer Zodiac)   

या लोकांनी कार्यक्षेत्रात सहकारी महिलांसोबत आदराने वागावे अन्यथा त्यांच्यासाठी ही गोष्ट महागात पडू शकते. तर व्यवसायिकांनी मेहनत केल्यास त्यांना नफा मिळणार आहे. तरुणांनी रात्रंदिवस केल्यास त्यांना यश मिळणार आहे. घरापासून कामासाठी बाहेर राहणाऱ्या लोकांनी कुटुंबासाठी काही भेटवस्तू घ्यावेत. पैशांचा व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक बाबतीत लक्ष द्या. प्रकृती ठिक राहणार असून पण एखाद्या गोष्टीवरुन मन उदास असणार आहे. 
शुभ दिवस: 28,30,3

सिंह (Leo Zodiac) 

सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदारी मिळणार आहे. तुमच्या कामावर वरिष्ठ खूश असणार आहे. व्यावसायिकांना उत्पादनांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे लागणार आहे. आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. मात्र आर्थिक खर्चही वाढणार आहे. चांगली बातमी कानावर पडणार आहे. जोडीदाराची काळजी घ्यावी लागणार आहे. चांगले आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल. 
शुभ दिवस: 29,30

कन्या (Virgo Zodiac)    

या राशीच्या लोकांना ऑफिसमध्ये आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ऑफिसमध्ये हेवा वाटणाऱ्यांपासून सावध राहवा. व्यापारी वर्गाला या आठवडय़ात चांगली नफा मिळणार आहे. तरुणांनी उत्साहाने काम करावे. आठवड्याच्या मध्यापर्यंत कुटुंबात काही धार्मिक विधी होणार आहे. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. हा आठवडा आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. 
शुभ दिवस: 29,30,3

तूळ (Libra Zodiac)  

कामाच्या ठिकाणी तूळ राशीच्या लोकांना समर्पित राहावं लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होणार आहे. भागीदारीत काम करणाऱ्यांना या आठवड्यात फायदा होणार आहे. तरुणांनी जास्त ऑनलाइन शॉपिंग करु नये आणि क्रेडिट कार्डचा वापर टाळा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आईची सर्व प्रकारे सेवा करावी लागणार आहे. खाण्यापिण्यामुळे आरोग्याची समस्या उद्ध्भवू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. 
शुभ दिवस: 29,3

वृश्चिक (Scorpio Zodiac)   

या राशीचे लोक त्यांच्या करिअर क्षेत्रात प्रगती करणार आहेत पण त्यासाठी त्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. तरुणांनी कामात निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा दाखवू नका. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास त्यांना परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणार आहेत. जोडीदाराच्या आरोग्याची समस्या निर्माण होणार आहे. गरोदर महिलांनी स्वत:ची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत तुम्हाला यश मिळणार आहे. 
शुभ दिवस: 29,2

धनु (Sagittarius Zodiac) 

धनु राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागणार आहे. व्यावसायिक कर्ज घेताना सावधगिरी बाळगावी. तरुणांना विचारवंतांकडून मार्गदर्शन होणार आहे. कुटुंबात मराठी म्हणीनुसार चार भांडी असल्यास ती वाजणारच. बीपीच्या रुग्णांनी औषधाची काळजी घ्यावी. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून आर्थिक लाभ होणार आहे. 
शुभ दिवस: 28,30,1, 3

मकर (Capricorn Zodiac)   

हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी आर्थिकबाबतीत अनुकूल असणार आहे. तुमच्या संपत्ती वाढ होणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. तर कार्यक्षेत्रात काम करताना सहकार्यांपासून सावध राहा. नको त्या वादा किंवा चर्चेच अडकू नका. व्यापारी वर्गानेही सध्या नफा मिळविण्यासाठी छोट्या योजनांवर भर द्यावा लागणार आहे. तरुणांनी व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष केंद्रित करावं. कुटुंबातील आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तुम्हाला पोटाची समस्या त्रासदायक ठरणार आहे. 
शुभ दिवस: 29,30,2

कुंभ (Aquarius Zodiac) 

या राशीच्या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगतीसोबत आदर वाढणार आहे. सहकार्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. एखाद्या कामाबद्दल चांगली बातमी मिळणार आहे. दुकानात किंवा गोदामात आवश्यकतेपेक्षा जास्त साठा ठेवू नका अन्यथा नुकसान होईल. जोडीदारासोबत प्रवासाला जाणार आहात. कुटुंबात अहंकाराचा कहल वाढण्याची शक्यता आहे. आठवडाभर सर्व काही सुरळीत असेल पण समाधान आणि आनंदाचा अभाव जाणवणार आहे.
शुभ दिवस: 28, 29, 3 

मीन  (Pisces Zodiac)  

या लोकांसाठी हा आठवडा आर्थिकदृष्ट्या शुभ असणार आहे. त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. कामासाठी बाहेर गावी जावं लागणार आहे. व्यापारी वर्गाच्या आस्थापनात माल साठ्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. आई-वडील, पत्नी आणि मुलांना थोडा वेळ द्या दिल्यास कामाच्या ताणापासून आराम मिळेल. डोळ्यांमध्ये काही समस्या तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार आहात. 
शुभ दिवस: 29, 1, 2, 3

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)