घरच्या घरी बनवा कोकमाचे आगळ; ही आहे सोप्पी रेसिपी

शरीराला थंडावा

उन्हाळ्यात कोकम सरबत प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. जेवणातही कोकमाचा वापर केला जातो

कोकम आगळ रेसिपी

आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कोकम आगळ कसं बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत.

पिकलेल्या कोकम फळांच्या साली, गर आणि मीठ यापासून आगळ तयार केले जाते.

सर्वप्रथम रतांबे म्हणजेच कोकमाचे मध्यभागी चिरुन आतील बिया काढून घ्या

बिया एका चाळणीवर ठेवून त्यात 4-5 चमचे मीठ घालून तीन ते चार तासांसाठी तसेच ठेवून द्या

बियांमधून निथळलेल्या पाण्यामध्ये चिरलेले रंताबे रात्रभर भिजवत ठेवून द्या

त्यानंतर रंताबे पाण्यातून बाहेर काढून कडक उन्हात तीन ते चार दिवसांसाठी वाळवत ठेवा

आता हा जो अर्क उरला आहे तो म्हणजेच आगळ. हा आगळ तुम्ही सोलकढी व मच्छीच्या जेवणासाठी वापरु शकता.

VIEW ALL

Read Next Story