LSG vs KKR highlights, IPL 2024 : केकेआरचा 98 धावांनी लखनऊवर दणदणीत विजय

LSG vs KKR Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 54 व्या सामन्यात आज लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर लखनऊ सुपर जाएंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders) या दोघं संघात सामना होणार आहे.

LSG vs KKR highlights, IPL 2024 : केकेआरचा 98 धावांनी लखनऊवर दणदणीत विजय

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Match  Live Score in Marathi: आज आयपीएलच्या 54 व्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स (LSG) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आमने सामने असणार आहे. हा सामना लखनऊ येथील अटल बिहारी वाजपेयी एकाणा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) करणार आहे. तर केएल राहुल (KL Rahul) एलएसजीचे नेतृत्व करताना दिसणार आहे. बघण्यायोग्य गोष्ट असणार की, बलाढ्य कोलकातासमोर लखनऊ आपल्या होमग्राउंडवर बाजी मारणार की नाही?

5 May 2024, 23:17 वाजता

कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल 98 धावांनी लखनऊ सुपर जाएंट्सवर विजय मिळवला आहे आणि यासोबतच 2 पॉइंट्ससोबत, पॉइंट्स टेबलच्या पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. 

5 May 2024, 23:08 वाजता

15 ओव्हरनंतर लखनऊ सुपर जाएंट्सचा स्कोर 130-8 असा आहे. या स्थितीतून लखनऊला जिंकण्यासाठी 28 बॉलमध्ये 105 धावा लागत आहेत.

5 May 2024, 23:05 वाजता

15 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाने क्रुणाल पांड्याची विकेट घेतली आहे. पांड्या हा 5 धावांवर बाद झाला आहे. रवी बिश्नोई आता फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 23:02 वाजता

वरूण चक्रवर्तीने 15 व्या ओव्हरमध्ये एश्टन टर्नरला 16 धावांवर बाद केलं आहे. या विकेटनंतर फलंदाजी करण्यासाठी युधवीर चरक आला आहे.

5 May 2024, 22:56 वाजता

सुनील नरेन याने 13 व्या ओव्हरमध्ये आयुष बदोनीला पण 15 धावांवर आउट केलं आहे. या विकेटनंतर क्रुणाल पांड्या हा फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 22:50 वाजता

आंद्रे रसल याने परत एकदा 12 व्या ओव्हरमध्ये लखनऊला आणखी एक धक्का बसला आहे. पाचव्या विकेटनंतर एश्टन टर्नर हा फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 22:41 वाजता

10 व्या ओव्हरमध्ये आंद्र रसलने लखनऊला मार्कस स्टॉयनिसच्या रूपात आणखी एक धक्का दिला आहे. स्टॉयनिस हा 36 धावांवर आ बाद झाला आहे. चौथ्या विकेटनंतर आयुष बदोनी हा फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 22:29 वाजता

9 व्या ओव्हरमध्ये वरूण चक्रवर्तीने, दिपक हूड्डा याला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे आणि फक्त 5 धावांवर तंबूत परत पाठवलं आहे. तिसऱ्या विकेटनंतर निकोलस पूरन हा फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 22:22 वाजता

8 व्या ओव्हरमध्ये हर्षित राणाच्या गोलंदाजीवर, लखनऊचा कॅप्टन के एल राहूल हा 25 धावांवर आउट झाला आहे. दुसऱ्या विकेटनंतर दिपक हूड्डा हा फलंदाजीसाठी आला आहे.

5 May 2024, 22:09 वाजता

5 ओव्हरनंतर लकनऊचा स्कोर हा 47-1 असा आहे. के एल राहूल हा 18 धावांवर, तर स्टॉयनिस पण 18 धावांवर त्याचे साथ देत आहे. या स्थितीत लखनऊला जिंकण्यासाठी 90 बॉलमध्ये 189 धावांची गरज आहे.