खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी, मग त्याहूनही किळसवाणं कृत्य! VIDEO वरुन वेटर गजाआड

Dirty act in Restaurant : एका व्हिडीओमुळे वेटरचं किळसवाण कृत्य समोर आलंय. तो खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी करायचा. एवढंच नाही तर अतिशय किळसवाणा कृत्य करायचा. 

नेहा चौधरी | Updated: May 13, 2024, 03:15 PM IST
खाद्यपदार्थ सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर लघवी, मग त्याहूनही किळसवाणं कृत्य! VIDEO वरुन वेटर गजाआड title=
urinate on food before serving it then an even more disgusting act big hotel Waiter video

Dirty act in Restaurant : चांगल्या चांगल्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये जेवायला जायला कोणाला नाही आवडत? पण तुमच्या आठवडत्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये अस्वस्छता आणि घाणेरडेपणा असेल तर...नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेटरचं किळसवाण आणि संतापजनक कृत्य ऐकून तुमचाही राग अनावर होईल. 

हा 21 वर्षीय वेटर ग्राहकांनी आर्डर केलेल्या अन्नपदार्थांना प्रायव्हेट पार्ट घासायचा आणि सॉस, ज्यूसमध्ये लघुशंका करायचा. धक्कादायक म्हणजे हे किळसवाण कृत्य करताना तो व्हिडीओ सोशल मीडिया साइडवर शेअर करायचा. याचे हे व्हिडीओ एफबीआयच्या नजरेस पडले आणि त्यांनी त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. 

या व्हिडीओमध्ये रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांवर आपले प्रायव्हेट पार्ट घासताना दिसत होता. त्यानंतर त्यांने लघुशंका केल्यानंतर अन्नपदार्थ पायाने तुडवलं. एवढंच नाही तर हेच अन्न त्याने ग्राहकांना दिलं. सोशल मीडियावरील या व्हिडीओचे टायटलसुद्धा सारखीच दिसून आलीत. ज्यात लिहिलं असायचं पिसिंग इन द सॉस, पिसिंग इन द रेस्टारंट फूड. 

या व्हिडीओवरुन एफबीआयने त्या वेटरचा शोध घेतला. एका रेस्टारंटच्या पार्किंग परिसरात त्याच्या नावाचे एक रजिस्टर त्यांच्या दृष्टीस पडले. त्यावरुन पोलिसांनी रेस्टॉरंटचा पत्ता शोधला. रेस्टॉरंटच्या लोकांना विचारल्यावर व्हिडीओमधील अन्न दिसत आणि जागाही त्याच रेस्टॉरंटची असल्याच उघड झालं. एफबीआय तिथे विचारपूस करत असताना तो स्वयंपाकघरात काम करत होता. सगळ्या वेटरला बोलवण्यात आले. व्हिडीओमधील वेटरटचे शूट हे त्या वेटरमधील एकाच शूट सारखेच दिसले. त्याला एफबीआयने पकडताच त्याने कृत्याची कबुली दिली. 

विचारपूस दरम्यान त्या वेटरने सांगितलं की, त्याने हे कृत्य जवळपास 20 वेळा केलंय. डेटिंग अॅप्स आणि फेटिश वेबसाइटवरील त्याचा मित्राने त्याला हे कृत्य करण्यास सांगितलं होतं. या वेटरचं नाव जेस क्रिस्टियन हॅन्सन हा प्रकार अमेरिकेतील कॅन्सस शहरातील एका हॉटेलमध्ये घडला आहे.