Monsoon

Monsoon : महाराष्ट्रात कधी दाखल होणार मान्सून? पाहा यंदाचं वेळापत्रक

अंदमान- निकोबार

हवामान विभागाच्या माहितीनुसार मान्सून 19 मे पर्यंत अंदमान- निकोबार बेटांवर दाखल होणार असून, पुढं काही दिवसातच तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल होणार आहे.

मान्सून महाराष्ट्रात

अंदमान आणि निकोबारमध्ये मान्सूनचं आगमन झाल्यानंतर पुढे 12 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होणार आहे.

मान्सून वेळेआधीच

गेल्यावर्षीच्य़ा तुलनेत यंदा मान्सून वेळेआधीच राज्यात दाखल होणार असल्यामुळं बळीराजाचा मोठा दिलासा मिळणार आहे.

केरळात केव्हा हजेरी?

27 ते 28 मे पर्यंत मान्सून केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे.

चक्राकार वारे

सध्या कन्याकुमारीच्या क्षेत्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, केरळातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

मान्सूनसाठी पूरक वातावरण

मान्सूनच्या आगमनासाठी ही एकंदर परिस्थिती पूरक असल्या कारणानं आता सर्वांनाच या मोसमी पाहुण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

VIEW ALL

Read Next Story