Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनी बनतोय विशेष राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार!

Gajlaxmi Rajyog in Taurus 2024 : 19 मे शुक्र रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे. यावेळी भाग्य आणि ज्ञानाचा कारक गुरु आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत 12 वर्षांनी वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: May 16, 2024, 07:55 AM IST
Gajlaxmi Rajyog: 12 वर्षांनी बनतोय विशेष राजयोग; 'या' राशींचं नशीब पालटणार! title=

Gajlaxmi Rajyog in Taurus 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये ग्रहांच्या गोचरमुळे खास राजयोग तयार होतात. ग्रहांमध्ये दानवांची देवता शुक्र आणि देवांचा गुरू गुरू यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. ज्यावेळी हे दोन्ही ग्रह त्यांच्या चालीमध्ये बदल करतात तेव्हा 12 राशींवर परिणाम होतो.

19 मे शुक्र रोजी वृषभ राशीत गोचर करणार आहे. यावेळी भाग्य आणि ज्ञानाचा कारक गुरु आधीच उपस्थित असणार आहे. अशा स्थितीत 12 वर्षांनी वृषभ राशीत शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास

तुमच्या राशीत गजलक्ष्मी राजयोगाची निर्मिती एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. मीडिया, मॉडेलिंग किंवा पत्रकारितेशी संबंधित लोकांना फायदा होणार आहे. लव्ह लाईफमध्ये तुमच्या जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. मोठी गुंतवणूक करणे देखील तुमच्यासाठी चांगलं ठरू शकणार आहे. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील.

सिंह रास

गजलक्ष्मी राजयोग या राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. बिझनेसमध्ये एखादी मोठी डील फायनल होऊ शकणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते. कामानिमित्त परदेश प्रवास होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकणार आहे. 

वृश्चिक रास

बृहस्पति आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लोकांना विशेष फळ मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदी करू शकता. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल आणि तुम्हाला हवे ते करू शकाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्यात यश मिळू शकणार आहे. काही नवीन काम सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. नोकरदार लोकांना वरिष्ठांकडून सहकार्य आणि प्रशंसा मिळणार आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )