मॉडेल नव्हे ही उपजिल्हाधिकारी! सिनेमाची ऑफर नाकारुन निवडला वेगळा मार्ग

 ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.

| May 13, 2024, 21:58 PM IST

Oshin sharma: ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.

1/11

मॉडेल नव्हे ही उपजिल्हाधिकारी! सिनेमाची ऑफर नाकारुन निवडला वेगळा मार्ग

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

Oshin sharma: ओशिन शर्मा हिमाचल प्रदेशातील अधिकारी आहेत. त्यांना डॉक्टर व्हायचे होते. त्यांनी राजकारणाच्या क्षेत्रातही प्रवेश केला. बॉलीवूड चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. पण हे सर्व त्यांनी नाकारले. 

2/11

आपला मार्ग निवडला

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन यांनी आपला मार्ग निवडला आणि त्या हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS) अधिकारी बनल्या. सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. 

3/11

हार मानली नाही

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन यांचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. त्या अनेकदा अपयशी ठरल्या पण या अपयशामुळे त्यांनी हार मानली नाही.

4/11

कांगडा जिल्ह्यातील रहिवासी

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन शर्मा हे हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. शिमला येथे त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील भुवनेश शर्मा नायब तहसीलदार आहेत. आई कांगडा येथील सेटलमेंट ऑफिसरची पीए म्हणून काम करत आहे. 

5/11

अभ्यासासाठी नेहमीच चांगले वातावरण

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन यांना कुटुंबात अभ्यासासाठी नेहमीच चांगले वातावरण होते. पूर्वी ओशिनला डॉक्टर व्हायचे होते. त्यानंतर महाविद्यालयीन काळात त्या विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाल्या. ओशिनने पंजाब विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले.

6/11

नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन अभ्यासात खूप हुशार होत्या. ओशिनचा कल पाहून त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना नागरी सेवांसाठी तयार होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यानंतर नागरी सेवेत रुजू होण्याचे त्यांचे स्वप्न बनले. 

7/11

परीक्षांची जोरदार तयारी

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन यांनीदेखील नागरी सेवा परीक्षांची जोरदार तयारी सुरू केली. पण 5 गुणांनी त्यांचे नागरी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न भंगले.ओशिन शर्मांसाठी हा धक्काच होता. पण त्यांनी मेहनत सुरूच ठेवली. 

8/11

2019 मध्ये यश

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

सरकारी नोकरीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. अनेक परीक्षा दिल्या. अनेक प्रयत्नांनंतर 2019 मध्ये हिमाचल प्रशासकीय सेवा (HAS)  बीडीओसाठी त्यांची निवड झाली.

9/11

10 वा क्रमांक

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन शर्मा यांना HAS मध्ये 10 वा क्रमांक मिळाला. सौंदर्यामुळे त्यांना चित्रपटाच्या ऑफर्सही आल्या. पण ओशिनच्या कुटुंबाला हे कदापी आवडणारे नव्हते.

10/11

चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

खुद्द ओशिनसुद्धा या गोष्टीसाठी सिनेमासाठी आपले मन बनवू शकल्या नाहीत. त्यांनी चित्रपटाच्या ऑफर नाकारल्या. त्यांना समाजसेवा करावीशी वाटते. त्या त्याच दिशेने पुढे जाऊ लागल्या. 

11/11

लाडली फाउंडेशनच्या ब्रँड ॲम्बेसेडर

Oshin sharma Success Story Career Details Marathi News

ओशिन या लाडली फाउंडेशनच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. सोशल मीडियावर त्या खूप सक्रिय असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर मोटिव्हेशनल पोस्ट करत असतात.