Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओ

Viral Video : सोशल मीडियावर एका चिमुकल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दुसऱ्या मजल्यावरुन तान्हुला प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा हा व्हिडीओ तुम्ही पाहिला का? 

नेहा चौधरी | Updated: Apr 29, 2024, 10:31 AM IST
Video : दुसऱ्या मजल्यावरून चिमुकल्या प्लास्टिकच्या शीटवर पडला अन्...श्वास रोखून धरणारा धक्कादायक व्हिडीओ  title=
chennai baby rescue video baby hanging on plastic sheet shocking viral video

Viral Video : सोशल मीडियावर क्षणाक्षणाला असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण रविवारी एका धक्कादाय व्हिडीओने सर्वांची झोप उडवली. साधारण सात आठ महिन्याचा चिमुकल्या दुसऱ्या मजल्यावरुन पडला आणि प्लास्टिकच्या शीट लटकला होता. त्याला वाचविण्यासाठी बिल्डिंगमधील लोकांनी जीवाची बाजी लावली. प्लास्टिकचं शीट आणि त्यात निष्पाप जीव...ना त्याला काही कळतंय ना त्याला काही बोलता येतं आणि स्वत:च्या जीव वाचविण्यासाठी काही धडपड करता येत आहे. ते तान्हुल त्या प्लास्टिकच्या शीटवर पालथ लटकलं होतं. (chennai baby rescue video baby hanging on plastic sheet shocking viral video)

श्वास रोखून धरणारा व्हिडीओ!

पाहता क्षणी प्रत्येकाला प्रश्न पडत होता की आता पुढे त्या मुलाचं काय होणार. अगदी श्वास रोखून हा व्हिडीओ प्रत्येक जण पाहत आहे. नेमकं झालं तरी काय काही कळत नव्हतं. त्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी बिल्डिंगमधील लोकांची धावपळ सुरु होती. महिलांच्या ओरडण्याचे आवाज आणि त्या चिमुकल्याचा आक्रोश हृदयाचे ठोके चुकत होते. 

...अन् अखेर दैव बलवत्तर ठरला!

हो, बिल्डिंगमधील लोकांनी त्या चिमुकल्याला वाचविण्यात जीवाची पर्वा केली नाही. हवे ते प्रयत्न त्यांनी त्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी केला. तीन मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये प्रत्येक क्षण पुढे काय होणार असा प्रश्न पडत होतो. तो चिमुकल्या कुठल्याही क्षणी त्या प्लास्टिकच्या शीटवरु खाली पडले या भीतीने बिल्डिंगमधील लोकांनी खाली भल्लीमोठी चादर पकडून ठेवली. काही लोकांनी गादीही आणल्याचा व्हिडीओमध्ये पाहिला मिळतं.
तर तुम्ही पाहू शकत असाल. पहिल्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून तीन चार लोक त्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. एक पिवळा टीशर्ट घातलेला व्यक्ती खिडकीतून खाली उतरला आणि दुसऱ्या व्यक्ती खिडकीचा आधार घेत उभा राहण्याचा प्रयत्न करत होता. त्याला ते मजल नाही तर दुसऱ्या व्यक्ती खिडकीवर उभा राहिला आणि दुसऱ्याने त्याला धरुन ठेवलं. त्या व्यक्तीने अतिशय चपळाईने आणि हुशारीने त्या बाळाला अलगद खाली घेतलं आणि लोकांनी आणि हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाने सुटकेचा श्वास घेतला. 

कुठली आहे ही घटना आणि नेमकं काय झालं?

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील Payal Mohindra या अकाऊंटवर शेअर करण्यात आलाय. तर तामिळनाडूमधील चेन्नईतील असून अवाडी या परिसरातील एका अपार्टमेंटमधील ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाल्कनीत आई त्या बाळाला दूध पाजत असताना तिच्या हातातून चिमुकला खाली पडला आणि तो प्लास्टिकच्या शीटवर पडला. या चिमुकल्याला वाचवितानाचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.