'माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत जे...', अभिनेत्री प्रणित हाटेला हॉटेलमध्ये आला धक्कादायक अनुभव

नुकताच अभिनेत्रीने सोबत एक धक्कादायक प्रसंग घडला या प्रसंगाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Updated: May 11, 2024, 04:38 PM IST
'माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत जे...', अभिनेत्री प्रणित हाटेला हॉटेलमध्ये आला धक्कादायक अनुभव title=

मुंबई : 'झी युवा'वरील 'युवा डान्सिंग क्वीन' या  शोमधून प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री प्रणित हाटे म्हणजेच गंगा. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी गंगा तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असते तर कधी ती तिच्या राहाणीमानावरुन चर्चेत असते. सोशल मीडियावरही अभिनेत्रीचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर गंगा कायमच तिचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. नुकतेच प्रणितने सोशल मीडियाच्या माध्यमातून एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
 
नुकताच अभिनेत्रीने सोबत एक धक्कादायक प्रसंग घडला या प्रसंगाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.इन्टाग्राम स्टोरीवर हॉटेलचा फोटो शेअर करत तिनं लिहिलं की, ''एका कार्यक्रमानिमित्ताने मी आज नाशिकमध्ये आले असून तिथल्या एका हॉटेलमध्ये रुम बूक केली होती. पण अचानक रुम बुकिंग रद्द करण्यात आली. जेव्हा मी कारण विचारलं तर ते म्हणाले, तुम्ही तृतीयपंथी आहात. तुम्हाला हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी नाहीये. अशावेळी तृतीयपंथींनी कुठे जायचं?''

ही स्टोरी शेअर केल्यानंतर गंगा इन्स्टावर लाईव्ह आली आणि यावर स्पष्टच बोलली. या विषयावर बोलताना गंगा म्हणाली, ''मला माहित नाही कित्येक जणांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी पाहिली असेल. पण यावर काय करता येईल? ते मला कळावा. मी आता सध्या नाशिकमध्ये आहे. पूजा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये आहे. मी इथं एका कार्यक्रमासाठी आले होते. नाशिकमध्ये माझा कार्यक्रम आहे. या हॉटेलमध्ये कालपासून बुकिंग केली होती. आज चेकिंगवेळी जेव्हा मी इथं आतामध्ये आले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

''माझे कागदपत्र वगैरे सगळं काही घेतलं आणि कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर सांगितलं की, तुमची बुकिंग रद्द करतोय. कारण तुम्ही तृतीयपंथी आहात.तर आता हा प्रश्न आहे, माझ्यासारखे अनेक तृतीयपंथी आहेत जे बाहेर कार्यक्रमासाठी किंवा कोणत्या कामानिमित्ताने बाहेर जातात. एक महत्त्वाचं सांगते आम्ही कुठलंही चुकीचं काम करायला आलो नाहीत. आम्ही वायफळ आणि घाणेरडं काम करायला आलो नाहीत. ज्याच्यामुळे हॉटेल बुकिंग रद्द केली जातेय. तर आम्हाला एवढंच कारण सांगितलं की, तुम्ही तृतीयपंथी आहात त्यामुळे तुमची बुकिंग रद्द केली. अशावेळी आम्ही कुठे जायचं? बुकिंग कुठे करायची. आता हॉटेलमध्ये लोगो लागणार आहेत का? किती हास्यास्पद आहे हे. आता आम्ही कार्यक्रमााठी तयार कुठे होणार? आराम कुठे करणार? या क्षणी काय करायला हवं? कुठे तक्रार दाखल केली पाहिजे? तृतीयपंथी आहोत म्हणून आम्हाला हॉटेलमध्ये राहण्याचा अधिकार नाही का? मी आजारी असते आणि खूप गरज असती तर काय केलं असतं?.''  असं अभिनेत्री इन्स्टा लाईव्हमध्ये म्हणाली.